सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !
‘हिंदु जागरण मंच’ची कारवाईची मागणी
|
सागर (मध्यप्रदेश) – येथील डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विश्वविद्यालयातील ‘बी.एस्.सी. बीएड्.’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने वर्गात हिजाब घालून नमाजपठण केले. यावर ‘हिंदु जागरण मंच’ने आक्षेप घेत तिच्यावर कारवाईची मागणी केली.
सागर विश्वविद्यालय के क्लास रूम में छात्रा ने हिजाब पहनकर पढ़ी नमाज, हिंदू संगठन बोले-‘नहीं बनने देंगे JNU’ #sagar #madhyapradesh #सागर #मध्यप्रदेश https://t.co/QBXzYLzzvI
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) March 26, 2022
हिंदु जागरण मंचच्या सागर जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश सराफ यांनी विद्यापिठाच्या कुलगुरु निलिमा गुप्ता आणि निबंधक संतोष सहगोरा यांच्याकडे याविषयी तक्रार प्रविष्ट केली. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.