कर्नाटकच्या अभ्यासक्रमातून क्रूरकर्मा टीपू सुलतानचे उदात्तीकरण हटवले !

  • काश्मीरचा इतिहास शिकवला जाणार

  • सुधारित अभ्यासक्रमाला कर्नाटक सरकारची मान्यता

  • सरकारने टीपू सुलतानचे उदात्तीकरण हटवले, ते अभिनंदनीयच आहे. त्यासह पुढील पाऊल म्हणून अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला टीपू सुलतान पुसून टाकण्यासाठी सरकारने पावले उचलावीत ! – संपादक
  • सहस्रो हिंदूंचे धर्मांतर करणारा, त्यांच्या सामूहिक हत्या करणारा, हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या आणि मंदिरांचा विध्वंत करणार्‍या क्रूरकर्मा टीपू सुलतानचा इतिहास इतकी वर्षे अभ्यासात असणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
  • अशा धर्मांध टीपू सुलतनाच्या इतिहासातून विद्यार्थ्यांनी कोणता बोध घेतला असेल ? – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील शालेय अभ्यासक्रमातून टीपू सुलतानचे उदात्तीकरण हटवण्याचा निर्णय रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीने घेतला. त्याजागी आता अभ्यासक्रमात काश्मीरच्या इतिहासावरील धड्यांचा समावेश करण्यात आला आहे. बाबा बुडनगिरी आणि दत्तपीठ यांविषयीची माहितीही समाविष्ट करण्यात आला आहे.

सरकारने दिली पुस्तकांच्या प्रकाशनाला अनुमती

वर्ष २०१७ मध्ये भाजप सरकारने सामाजिक शास्त्र भाग १ मध्ये हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या काही प्रकरणांवर अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने १०वी पर्यंतच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा केल्या आहेत. सरकारने हा सुधारित अभ्यासक्रम स्वीकारला असून याविषयीच्या २०२२-२३ मधील पुस्तक प्रकाशनाला अनुमतीही दिली आहे.

हिंदु धर्माविषयी चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या ! – शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले की, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्ध्यांना हिंदु धर्माविषयी चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. इयत्ता ६वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात, ‘भारतात इतर धर्मांचा उदय ‘वैदिक धर्मा’च्या कमतरतेमुळे झाला’, ‘यज्ञ करतांना शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या जनावरांचा बळी दिला जातो आणि धार्मिक विधी करतांना अन्नधान्य जाळल्यामुळे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो’, असे शिकवले जात होते. या प्रकरणांमुळे हिंदुविरोधी भावनांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

वर्ष २०१९ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने टीपू जयंती महोत्सव रहित केला होता. वर्ष २०१५ मध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने टीपू जयंती महोत्सव पुन्हा चालू केला होता.

पाठ्यपुस्तकातून बाबर, अकबर, औरंगजेब आदी धर्मांध बादशाहांनाही काढून टाकले पाहिजे ! – भाजपचे आमदार यत्नाल

बेंगळुरू (कर्नाटक) – ज्यांचे अधिक उदात्तीकरण करण्यात आले आहे, अशा बाबर, अकबर, औरंगजेब आणि अन्य धर्मांध बादशाहांना पाठ्यपुस्तकातून काढून टाकले पाहिजे, अशी मागणी विजापूर शहरातील भाजपचे आमदार यत्नाल यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीने टीपू सुलतान याची माहिती पाठ्यपुस्तकातून हटवण्याची शिफारस केली आहे. त्याविषयी ते बोलत होते.

आमदार यत्नाल पुढे म्हणाले की, आम्ही ‘अकबर द ग्रेट’ असे शिकलो; परंतु हिंदूंच्या झालेल्या धर्मांतराविषयी आणि दडपशाहीविषयी आम्हाला काहीही शिकवण्यात आले नाही. टीपू सुलतानने कर्नाटकातील कोडगूमध्ये १ लाख हिंदूंना ठार मारले; परंतु त्याला ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून गौरवण्यात आले. इतिहासाचे विकृतीकरण करणे चुकीचे आहे. केवळ तुष्टीकरणासाठी काही बादशाहांचा गौरव करण्यात आला आहे. तो पालटण्याची वेळ आली असून तेच आमचे सरकार करत आहे. आता पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे धडे असले पाहिजेत.

(म्हणे) ‘पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणार्‍या समितीत हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व्यक्तीची नियुक्ती, म्हणजे ‘शिक्षणाचे भगवेकरण’ करण्याचा प्रयत्न !’ – काँग्रेसचा हिंदुद्वेष

इतकी वर्षे टीपू सुलतानचा समाविष्ट इतिहास असलेल्या इतिहासावरून काँग्रेसने कधी ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ झाल्याचे म्हटले नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

\रोहित चक्रतीर्थ समितीने इयत्ता ६वी ते १०वी पर्यंतच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा केली आहे. चक्रतीथ हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे मानले जातात. सत्ताधारी भाजपने केलेली त्यांची नियुक्ती, म्हणजे ‘शिक्षणाचे भगवेकरण’ करण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.