काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध
(म्हणे) ‘धार्मिक सद्भाव बिघडू शकतो !’
काँग्रेसच्या लेखी धर्मांधांनी आक्रमण करायचे आणि हिंदूंनी मार खात रहायचा, हाच धार्मिक सद्भाव आहे. त्यामुळे हिंदूंना आता वस्तूस्थिती सांगितली जाऊ लागल्यानेच काँग्रेसींना मिरच्या झोंबू लागल्या आहेत आणि ते अशा संग्रहालयाला विरोध करत आहेत ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराविषयी भोपाळमध्ये उभारण्यात येणार्या संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी विरोध केला आहे. ‘यामुळे धार्मिक सद्भाव बिघडू शकतो’, असे सिंह यांनी ट्वीट करून म्हटले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून अशा प्रकारचे संग्रहालय उभारण्यासाठी भूमी मागितली होती. याला मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली आहे.
Gandhi family loyalist Digvijay Singh opposes memorial for Hindus killed by Islamists, says it will ‘disturb communal harmony’ in Bhopalhttps://t.co/p9hq1JnxzQ
— OpIndia.com (@OpIndia_com) March 26, 2022
दिग्विजय सिंह यांच्या विरोधावर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करून म्हटले की, तुम्ही गेल्या ३८ वर्षांत भोपाळ वायू दुर्घटनेवर एक स्मारकही बनवू शकला नाहीत. जर शिवराज सिंह चौहान मानवतेसाठी चांगले काम करत आहेत, तर सिंह यांना इतकी इर्षा का आहे ?