श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलांना पूजा करण्यास रोखण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी धर्मांधांना पूजेविषयी माहिती देऊन महिलांना पूजा करू देण्यास सांगितले; मात्र धर्मांधांनी पोलिसांचे ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या पोलीस फौजफाटा बोलावून हिंदु महिलांना तेथे पूजा करण्यास सांगितले. मुसलमानांचे म्हणणे होते की, ‘येथे पूर्वी कधीही पूजा होत नव्हती.’ याविषयी प्रशासकीय अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी सांगितले की, ही पूजा स्थानिक परंपरा असून ती होऊ दिली पाहिजे.

बसौडा पूजा म्हणजे काय ?

बसौडा पूजा ही ऋतू पालटाचे प्रतीक म्हणून केली जाते. या वेळी श्री शीतलामातेची पूजा केली जाते. श्री शीतलामाता त्वचारोगापासून रक्षण करते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या पूजेला ‘शीतला सप्तमी’ किंवा ‘शीतला अष्टमी’ असेही म्हटले जाते.