देशातील सर्व मुसलमान आणि ख्रिस्ती भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जातील !
कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांचे विधानसभेत विधान !
तो दिवस कधीच येणार नाही !- काँग्रेसच्या आमदारांचा आक्षेप
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांना उद्देशून ‘तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला रा.स्व. संघाला ‘आपला रा.स्व. संघ’ म्हणून मान्यता द्यावी लागेल’ असे म्हटले. यावर काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ‘देशातील सर्व मुसलमान आणि ख्रिस्ती भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जातील’, असा दावा कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते के. एस्. ईश्वरप्पा यांनी केला. त्यावर काँग्रेसच्या आमदारांनी ‘तो दिवस कधीच येणार नाही’, असे म्हटले.
All Muslims, Christians will be with RSS in future, says Karnataka Minister KS Eshwarappa
Follow our live blog for live updates from #Bengaluru and #Karnataka: https://t.co/qRCC7HYGOr
— Express Bengaluru (@IEBengaluru) March 25, 2022