साधना हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला पाहिजे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था
सोलापूर येथे साधना सत्संग जिज्ञासू शिबिर
सोलापूर – ईश्वराने आपल्याला मानवाचा जन्म हा सुख उपभोगण्यासाठी दिला नसून तो साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच दिलेला आहे. आपण केवळ मानवी जीवनातच साधना करू शकतो, असे असल्याने साधना हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या २१ मार्च या दिवशी टाकळीकर मंगल कार्यालयात साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात समारोपप्रसंगी बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर व्यासपीठावर श्रीमती अलका व्होनमारे याही उपस्थित होत्या.
श्रीमती अलका व्हनमारे आणि श्री. दत्तात्रय पिसे यांनी गुरु आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले, तर (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी ‘हलाल’ या विषयाच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विशेष
१. हे शिबिर होण्याच्या अगोदर धर्मप्रेमींसाठी २ दिवसांची कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत सहभागी असणारे १५ जण या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात वडील-मुलगा, आई-मुलगी असे कुटुंबियही सहभागी झाले होते.
२. अनेक शिबिरार्थिंनी साधना सत्संगामुळे त्यांच्यात झालेले पालट, अनेक अडचणींवर कशाप्रकारे मात करून समष्टी सेवा करत आहे याविषयी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले.
छायाओळ –