आतंकवाद्यांचे समर्थन करणारे लोक चित्रपटावर टीका करत आहेत !

‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची स्पष्टोक्ती !

‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ‘हा दोन धर्मांमध्ये वर्गीकरण करणारा किंवा फूट पाडणारा चित्रपट आहे’ असे म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, अशा शब्दांत या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाला विरोध करणार्‍यांवर टीका केली आहे.

सौजन्य : ETimes

‘इ-टाइम्स’ला मुलाखत देतांना विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘‘या चित्रपटात इतिहासाची एक काळी; पण सत्य बाजू दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट आतंकवादाचा विरोध करतो. मानवतेचे समर्थन करणारे, मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि आतंकवादाच्या व्यवसायात असलेले लोक यांच्यात फरक आहे. जे आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत, ते एका बाजूला आहेत. आमच्या बाजूला मानवतेचे समर्थन करणारे लोक मोठ्या संख्येने उभे आहेत. हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील भेद दाखवतो.’’