होळी आणि रंगपंचमी यांमध्ये होणार्या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे मुझफ्फरपूर अन् हाजीपूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
मुझफ्फरपूर (बिहार) – होळी आणि रंगपंचमी या उत्सवांना सध्या विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी शिवीगाळ करणे, तोंडाला काळे फासणे, मद्य पिऊन गोंधळ घालणे अशा प्रकारचे अधार्मिक आणि अयोग्य वर्तन लोकांकडून होतांना दिसते. रंगपंचमीच्या दिवशी भयभीत वातावरण असल्यामुळे अनेक नागरिक, महिला आणि मुली घराबाहेर पडत नाहीत. सामाजिक स्थिती, महिलांची सुरक्षा आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य या सर्वांच्या दृष्टीने असे होणे, हे गंभीर आहे. अशा प्रकारचे होळी आणि रंगपंचमी यांमध्ये होणारे अपप्रकार थांबवावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुझफ्फरपूर अन् हाजीपूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.