ग्रेटर फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते ‘सनातन शॉपी’चे उद्घाटन
ग्रेटर फरिदाबाद – समाजात सात्त्विकता वाढावी, यासाठी येथील सनातन संस्थेचे हितचिंतक तथा ‘अपना ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन कपिल यांनी त्यांच्या दुकानाच्या तळघरामध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. ‘सनातन शॉपी’ असे या विक्रीकेंद्राचे नाव असून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून तिचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री गणेशाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली, तसेच ‘जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले.
सनातनची सात्त्विक उत्पादने उच्च गुणवत्ता आणि सात्त्विकता यांसाठी प्रसिद्ध आहेत. या उत्पादनांच्या मागे शुद्ध अध्यात्म आणि गुरूंचा संकल्प आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी विविध अनुभूती घेतल्या आहेत. ही उत्पादने स्वदेशी आणि आयुर्वेदिक आहेत. त्यामुळे त्याच्या वापराने स्वदेशी व्रताचे पालन आणि हिंदु संस्कृती यांचे पोषण होते. सनातनच्या या सात्त्विक उत्पादनांमध्ये गोअर्क, कुंकू, अष्टगंध, अत्तर, उदबत्ती, भीमसेनी कापूर, जपमाळ, दंतमंजन, उटणे, साबण, शिकेकाई, त्रिफळा चूर्ण आदींचा समावेश आहे.
‘या विक्रीकेंद्रात समाजाला धर्मशिक्षण मिळावे, समाजाने योग्य साधना करावी, समाजात धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या स्थापनेविषयी जागृती व्हावी’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शास्त्रीय भाषेत संकलित केलेले विविध भाषांतील ग्रंथही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.