धनंजय मुंडे यांनी ६ मुले आणि बायका लपवल्या आहेत ! – करुणा शर्मा
कोल्हापूर, २४ मार्च – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक बायका आणि ६ मुले लपवली आहेत. त्यामुळे यापुढील काळात त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी आवेदन दाखल करतांना तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली. करुणा शर्मा या कोल्हापूर येथे पहिली पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यासाठी उमेदवारी आवेदन दाखल केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
करुणा शर्मा पुढे म्हणाल्या, ‘‘आमच्या प्रेमकहाणीवरील पुस्तक अंतिम टप्प्यात आहे. या पुस्तकातून मी अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात आमची २५ वर्षांची कहाणी असेल. या पुस्तकात पुराव्यांसोबत आमच्या विवाहाची छायाचित्रेही असतील. हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून झाले असून, ते हिंदीसमवेत मराठी भाषेतही असेल.’’ दरम्यान या संदर्भात श्री. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया अद्याप कळू शकलेली नाही.