भारतात वायूप्रदूषण हा आरोग्यावर परिणाम करणारा दुसरा सर्वांत मोठा घटक ! – विदेशी आस्थापनाचा निष्कर्ष

यावर आजपर्यंत उपाय न काढणे, हे स्वातत्र्यानंतरच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – स्वित्झर्लंड येथील ‘आयक्यू एअर’ या आस्थापनाने ‘जागतिक वायू गुणवत्ता २०२२’ हा अहवाला प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतात मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करण्यामध्ये वायूप्रदूषण हा दुसरा सर्वांत मोठा घटक ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘भारतातील वायूची गुणवत्ता कोरोनाच्या पूर्वीच्या काळात ज्या स्तरावर होती, त्या स्तरावर पुन्हा परतली आहे’, असेही यात म्हटले आहे.

भारतामध्ये वाहनातून सोडण्यात येणारा धूर, वीज उत्पादन, औद्योगिक कचरा आदी गोष्टींमुळे वायूप्रदूषण होत आहे.