संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनविषयीच्या रशियाच्या प्रारूपावरील मतदानात भारत तटस्थ

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – रशियाने युक्रेनमधील मानवतावादी परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रारूप सादर केले. या वेळी भारताने तटस्थतेचे धोरण कायम ठेवत यावर मतदान करण्याचे टाळले. भारतासह १३ देशांनी या प्रारूपावरील मतदानात भाग घेतला नाही, तर चीनने या प्रारूपास पाठिंबा दिला.

दुसरीकडे इस्रायलने रशियाची भीती दाखवून ‘पेगासस’ हे गुप्तचर ‘सॉप्टवेअर’ युक्रेनला देण्यास नकार दिला आहे.