माहीम (मुंबई) येथील वाचिका श्रीमती नीता गोरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे भगवंत आणि संत यांच्या आशीर्वादामुळे चालते. त्यात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या उद्देशाला धरून लिखाण असल्यामुळे ‘सनातन प्रभात’मध्ये चैतन्य पुष्कळ प्रमाणात आहे. आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य सहन न झाल्यामुळे त्रास होतो. ज्यांना आध्यात्मिक त्रासामुळे शारीरिक त्रास होतो, त्यांचा त्रास दैनिकातील चैतन्यामुळे न्यून होतो. – संपादक
१. प्रारंभी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना मला पुष्कळ जांभया यायच्या. ‘या दैनिकामुळे पुष्कळ त्रास होतो. हे दैनिक वाचू नये’, असे जाणवायचे. त्यानंतर कापूर-अत्तर लावणे, उदबत्तीने आवरण काढणे आदी आध्यात्मिक उपाय केल्यावर मला दैनिक वाचता यायचे.
२. ‘सनातन प्रभात’चा अंक आज्ञाचक्रावर ठेवल्यावर तीव्र डोकेदुखी थांबणे
फेब्रुवारी २०२२ मध्ये मला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी उपचार करूनही डोकेदुखी थांबली नाही. त्या वेळी सनातनचे साधक श्री. विवेक भोईर (माझा भाऊ) यांनी मला नामजप करण्यास सांगितला. त्याप्रमाणे जप केल्यावर आज्ञाचक्रावर पुष्कळ वेदना होत होत्या. दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक गुंडाळी करून आज्ञाचक्रावर ठेवून नामजप केल्यावर माझी तीव्र डोकेदुखी काही दिवसांत बंद झाली आणि मला उत्साही अन् आनंदी वाटू लागले.
३. झोपतांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डोक्याखाली ठेवल्याने पुष्कळ सकारात्मक पालट जाणवणे
रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डोक्याखाली ठेवून मी झोपायला प्रारंभ केला आणि समवेत बारीक आवाजात भ्रमणभाषवर नामजप लावू लागले. यामुळे मला पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने ज्ञान तर मिळतेच; पण ‘देह आणि मन यांची शुद्धी होऊ लागली’, असे मला जाणवले.