सत्ययुगाचा प्रारंभ करील सनातन प्रभात !
देवा, तुझे किती आभार, सुंदर हे सनातन प्रभात सनातन प्रभात ।
पहाटे पहाटे येतो, गुरूंचा प्रसाद ।। १ ।।
दिवसाचा प्रारंभ होतो चैतन्य घेऊनी ।।
बुद्धीवरील आवरण, जाईल हो पुसूनी ।। २ ।।
मन शांत होई, सनातन वाचूनी ।।
अज्ञानाचे आवरण जाईल पुसूनी ।। ३ ।।
मार्ग दाखवी हा सत्याचा, विजय होईल विश्वाचा ।।
झेंडा फडकवी विजयाचा, नाश होईल वाईटाचा ।। ४ ।।
विरोधकांचा विरोध तोडून टाकी सनातन प्रभात ।।
संकटामागूनी संकट येती, तरी गुरुदेव धावूनी येती ।। ५ ।।
लपलेले सत्य शोधून काढी, दैनिक सनातन प्रभात ।।
सुखी आनंदी जीवनासाठी, मार्ग दाखवी सनातन प्रभात ।। ६ ।।
हिंदु राष्ट्राची पहाट, घेऊन येई सनातन प्रभात ।।
गुरुदेवांचा प्रसाद जाईल सार्या विश्वात ।। ७ ।।
सत्ययुगाचा प्रारंभ करील सनातन प्रभात ।
गुरुदेवांना करूया वंदन, प्रतिदिन वाचूया सनातन प्रभात ।। ८ ।।
– श्री. सूर्यकांत परब, नवीन पनवेल, रायगड