कोरोनाच्या प्रतिकूल काळात वाचकांसाठी आधारस्तंभ ठरलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !
‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शनामुळे स्थिर रहाता आले ! – प्रकाश मोरे, कोपरखैरणे, नवी मुंबई
मी आणि माझी पत्नी वर्ष २००२ पासून दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहोत. दैनिकातून अध्यात्माविषयी मिळणारे मार्गदर्शन विशेष उल्लेखनीय आहे. कोरोना संकटकाळात समाजात भीतीचे वातावरण असतांना दैनिकातून मिळणार्या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्थिर रहाता आले.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेला नामजप केल्याने आईच्या आजाराची भीती निघून जाणे ! – सौ. रूपाली सिधनकर, अकोला.
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून साधना कशी करावी, स्वभावदोष घालवणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. ‘प्रत्यक्ष तशी कृती केल्यावर स्वभावात पालट झाला’, असे माझ्या यजमानांनी सांगितले. ‘सनातन प्रभात’मध्ये वेळोवेळी येणारे नामजप आणि आध्यात्मिक उपाय केल्यामुळे मला पुष्कळ लाभ झाला. कोरोनाच्या काळात माझ्या आईला कोविडची भीती वाटत होती. तिला मधुमेह आणि इतर आजारही आहेत. त्या वेळी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिलेला नामजप आम्ही सर्वांनी केल्यानंतर आईला वाटणारी आजाराची भीती निघून गेली.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |