हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी
बीरभूम (बंगाल) येथे ८ जणांना जाळून ठार मारल्याचे प्रकरण
नवी देहली – बंगाल राज्यातील बीरभूम येथे झालेल्या हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार बंगाल राज्य सरकारला या प्रकरणी सर्वतोपरी साहाय्य करील, असे आश्वासनही पंतप्रधानांनी या वेळी दिले.
बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. यात ८ जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
मैं पश्चिम बंगाल के बीरभूम में हुई हिंसक वारदात पर दुख व्यक्त करता हूं, अपनी संवेदना व्यक्त करता हूं।
मैं आशा करता हूं कि राज्य सरकार, बंगाल की महान धरती पर ऐसा जघन्य पाप करने वालों को जरूर सजा दिलवाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 23, 2022
आतापर्यंत २१ जणांना अटक
बंगालमधील या भीषण घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे उघड केलेली नाहीत.
उच्च न्यायालयाकडून बंगाल सरकारला उत्तर देण्याचा आदेश
या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला २४ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर देण्याचा, तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींना संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे.
(म्हणे) ‘बीरभूमसारख्या घटना उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्येच अधिक होतात !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
बीरभूम येथील हत्याकांडाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या घटनेचे समर्थन करता येणार नाही; परंतु अशा घटना उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्येच अधिक घडतात. (इतक्या संवेदनशील गोष्टीचे राजकारण करणारे राज्यकर्ते जनहित काय साधणार ? जनतेला असे राज्यकर्ते मिळणे, हे लोकशाहीचे अपयश आहे ! – संपादक)
Not justifying Birbhum killings, but such incidents are more frequent in UP, Gujarat, Madhya Pradesh, Bihar and Rajasthan: Bengal CM Mamata Banerjee
— Press Trust of India (@PTI_News) March 23, 2022
‘टेलिग्राफ इंडिया’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीतून हत्याकांडात ठार झालेले सर्व मुसलमान असल्याचे उघड !
‘टेलिग्राफ इंडिया’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार
The victims include a child and six women, aged between seven and 52, and a newly married couplehttps://t.co/lj3hz2a2jc
— The Telegraph (@ttindia) March 23, 2022
‘बीरभूम येथील घटनेत जहानरा बीबी, लिली खातुन, शीली बीबी, नुरनेहार बीबी, रूपाली बीबी, काझी साजिदुर रहमान, तुली खातुन आणि मीना बीबी अशी मृत पावलेल्या ८ जणांची नावे आहेत.’
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने या घटनेविषयी धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आदींचा चमू गप्प आहे. अशी घटना भाजपशासित राज्यात घडली असती, तर हा भारतविरोधी गट शांत बसला असता का ? यातून त्याची धर्मनिरपेक्षता आणि मुसलमानप्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते ! |