(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मिळालेले १५० कोटी रुपये काश्मिरी हिंदूंसाठी दान करावे !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मध्यांतरानंतर कंटाळवाणा (बोअरिंग) आहे. हा चित्रपट निर्माण करण्यासाठी १७ कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत; मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याने हा पैसा काश्मिरी हिंदूंसाठी दान करावा, असे विधान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत अनुदान मागण्यांवरील चर्चेच्या वेळी केले.
काल विधानसभेत अनुदान मागणीवर चर्चा सुरू असताना विरोधी बाकावरील आमचे सहकारी राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडून काश्मीर फाईल्स चित्रपट पहायला गेले होते. या चित्रपटाने १५० कोटी इतकी कमाई केली. हे पैसे काश्मिरी पंडितांची घरे बांधण्यासाठी दान करण्याची विनंती भाजपने निर्मात्याकडे करावी. pic.twitter.com/7DQ6NuoC79
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 23, 2022
या चर्चेच्या वेळी सभागृहात सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि मंत्री उपस्थित होते; मात्र भाजपचे २ सदस्य वगळता इतर सदस्य उपस्थित नसल्याविषयीचे सूत्र जयंत पाटील यांनी उपस्थित केले. त्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही सर्वजण (भाजपचे आमदार) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पहायला गेलो होतो. त्यामुळे उपस्थित नव्हतो’, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोमणा मारत वरील विधान केले.
प्रत्येक भारतियाने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पहायला हवा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, हा चित्रपट पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निःशब्द झालो. प्रत्येक भारतियाने हा चित्रपट पहायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय क्रांती आणली, हे पहायचे असेल, तर हा चित्रपट पहायलाच हवा. चित्रपटात काश्मीरमधील सत्य दाखवण्यात आले आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्यांनी तर हा चित्रपट पहायलाच हवा. हा चित्रपट कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. |