पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ उष्णतेमुळे वितळत असल्याने अनेक देश आणि द्वीप पाण्याखाली जातील ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

विज्ञानामुळे पृथ्वीचा होत असलेला विनाश !

नवी देहली – पृथ्वीच्या आर्क्टिक आणि अंटार्क्टिक या दोन्ही ध्रुवांवर अचानक तापमानात वाढ झाली आहे. तेथे उष्णतेच्या लाटा येण्यास प्रारंभ झाला आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर उन्हाळ्यामध्ये या दोन्ही ध्रुवांवरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतील. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन अनेक देश, द्वीप आणि राज्ये पाण्याखाली जातील. बर्फाची चादर हटल्यामुळे उष्णता वाढून भूमी आणि समुद्र दोघांवरही परिणाम होईल, अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे.

वास्तविक मार्च मासामध्ये अंटार्क्टिकवर शीत लहर चालू होते; कारण तेथे निसर्गतःच उन्हाळ्यापासून वाचवण्याची यंत्रणा असते. आर्क्टिकमध्ये उन्हाळा वाढू लागतो; पण हा उन्हाळा दिवसांच्या लांबीनुसार वाढत जातो. यंदा या प्रक्रियेला वेग आला असून दोन्ही प्रक्रिया एकत्र होतांना दिसत आहेत.