पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे पॅकबंद दूध, तसेच मॅगी महाग !
नवी देहली – पेट्रोल आणि डिझेल यांच्यातील दरवाढीमुळे दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. अमूल, मदर डेअरी आणि पराग यांसारख्या सहकारी दूध संघांचे ‘पॅकबंद दूध’ प्रतिलिटर २ रुपयांनी महागले आहे. ‘नेस्ले’च्या ‘मॅगी नूडल्स’च्या लहान पाकिटावर २ रुपये, तर मोठ्या पाकिटासाठी ३ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
From Maggi to Petrol, Diesel; here are list of things that got expensive this month#Maggi #PetrolDiesel https://t.co/k3uI6hvwN2
— APN NEWS (@apnnewsindia) March 22, 2022
नेसकॅफे क्लासिक, ब्रू आणि ताजमहल यांच्या मूल्यांतही वाढ करण्यात आली आहे.