द्विभाषिक पाठ्यपुस्तकांद्वारे ‘एकात्मिक पुस्तक’ ही संकल्पना राबवण्यात येणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
|
मुंबई – विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे होत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने एकाच पुस्तकात सर्व विषयांचे धडे मिळतील, असा प्रयत्न केला आहे. यातून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून होईल. सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून ‘एकात्मिक पुस्तक’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक सिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत म्हटले.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सरकारी शाळेतील मुलांना इंग्रजीचे चांगले ज्ञान व्हावे, यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी शब्दांना इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्दही असतील. त्यामुळे एकाच वेळी मुलांना वेगवेगळे शब्द आणि संज्ञा यांचा परिचय होईल. त्यांचे इंग्रजी चांगले होण्यास साहाय्य होईल.’’