दैनिक ‘सनातन प्रभात’ची अलौकिकता दर्शवणारे प्रसंग !
१. एका संघटनेच्या कार्यकर्त्याच्या विचारसरणीत झालेले परिवर्तन !
१ अ. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम सनातन प्रभातच्या साधकाशी वाद घालणे, सनातन संस्थेच्या उत्तरदायी साधकांच्या भेटीनंतर त्यांच्यात आमूलाग्र पालट होणे : मी गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करतो. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना दैनिक द्यायचो. त्यातील काही वृत्तांवरून ते माझ्याशी प्रतिदिन ३-४ दिवसांनी वाद घालायचे. ते मला म्हणाले, ‘‘आमच्यासारख्या संघटनेसमोर तुमची संघटना एकदम लहान आहे. तुम्ही आमच्यावर टीका का करता ? हे योग्य नाही.’’ सनातन संस्थेचे एक उत्तरदायी साधक एकदा नागपूरला आले असतांना त्यांनी त्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि सनातनची भूमिका त्यांना समजावून सांगितली. तेव्हापासून ‘सनातनची भूमिका योग्य आहे’, हे त्यांना पटले. एकदा ते कार्यकर्ते मला म्हणाले, ‘‘आधी मी अन्य एक दैनिक पूर्ण वाचत होतो आणि सनातन प्रभात थोडेच वाचत असे; पण आता उत्तरदायी साधकांच्या भेटीनंतर मी दैनिक सनातन प्रभात पूर्ण वाचतो आणि अन्य दैनिक थोडेसच वाचतो. (आता ते वाचक सनातन प्रभातला विविध प्रकारे सहकार्य करतात. त्यामुळे ते सनातनचे हितचिंतकच झाले आहेत.)
१ आ. एकदा ते कौतुकाने मला म्हणाले, ‘‘सनातनचे सर्व साधक तन, मन आणि धन यांचा त्याग करून राष्ट्र-धर्माचे कार्य करतात. तसे करणारे आमच्याकडे १० टक्के कार्यकर्तेही नाहीत.’’
२. ‘हिंदु राष्ट्र येणारच’, असा विश्वास दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे वाटत असल्याचे हिंदुत्वनिष्ठाने सांगणे
एका संघटनेचे कार्यकर्ते मला म्हणाले, ‘‘याआधी ‘हिंदु राष्ट्र येणार नाही’, असे वाटून निराशा यायची; पण ‘हिंदु राष्ट्र येणारच’, असा विश्वास मला दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे वाटू लागला आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हेच हिंदु राष्ट्र आणणार आहेत.’’
या कार्यकर्त्याच्या मुलाने एकदा सांगितले, ‘‘तुम्हाला काहीही साहाय्य लागल्यास आम्हाला सांगा. ‘तुम्हाला काय लागेल ते द्या’, अशी सूचना आम्ही आमच्या घरातील सदस्यांना दिली आहे. जरी आम्ही घरी नसलो, तरी तुम्ही कोणतेही साहाय्य केव्हाही मागू शकता.’’
३. हिंदूंना दिशा देणारे सनातन प्रभात !
माझे वडील एका गावात धर्मप्रसारासाठी गेले होते. गावाच्या बाहेर एका फलकावर ‘महंमद के नगरीमे आप सबका स्वागत है ।’ असे लिहिलेले आढळले. गावातील एका धर्मप्रेमीने त्यासाठी प्रयत्न केल्यावर त्या फलकाच्या शेजारी दुसरा फलक लावण्यात आला. त्यावर ‘प्रभु श्रीरामचंद्रजी के नगरी मे आप सबका हार्दिक स्वागत !’ दोन्ही फलकांची छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘सनातन प्रभात’ हे अत्यंत तेजस्वी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक आहे. यातून हिंदूंना दिशा मिळाली.
४. सनातन प्रभातचे कृतीशील वाचक !
काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या प्रतिकूल काळात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या काही वर्गणीदारांनी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली होती.
५. मी दैनिकाचे वितरण करायला जायचो, तेव्हा मला पाहून काही वर्गणीदारांना पुष्कळ आनंद होत असे. यातूनच वर्गणीदारांना दैनिक ‘सनातन प्रभात’ किती आवडते, याची जाणीव व्हायची.
६. दैनिकाचे वितरक वर्गणीदारांना अंक वेळेत दिले जातात का, याचीही पडताळणी सनातन संस्था मधे मधे करत असते. याविषयी एक वाचक मला म्हणाले, ‘‘सनातन संस्थेची सेवा एकदम पद्धतशीर (सिस्टिमॅटिक) असते.’’
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा अनेक वर्षे करायला मिळाली, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– श्री. चैतन्य शास्त्री, नागपूर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |