श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !
१. संतांना मागची आठवण नसते आणि त्यांच्या मनात पुढचा विचार येत नाही. संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते.
२. संतांचे मन ओळखून त्यांची सेवा करण्यासाठी उत्तम शिष्यासारखा भावच हवा, तरच ईश्वराचे खरे भक्त होता येते.
३. आपण एखाद्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन घेतो, तेव्हा ते केवळ त्या व्यक्तीचे दर्शन नसून त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी ऊर्जेचे दर्शन असते.
४. ईश्वरप्राप्तीसाठी सतत धडपड करणार्या आणि खर्या अर्थाने हिंदू म्हणून जगणार्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून तिला भेटणे आणि साधना सांगणे, हे तिच्या दृष्टीने देवदर्शन आहे.
५. देवदर्शनाला स्थुलाचे बंधन आहे; पण देवस्मरणाला त्याचे बंधन नाही. आपण असू, तिथे त्याला अनुभवता येऊ शकते. त्यासाठी आपली तेवढी श्रद्धा आणि तळमळ हवी.
६. साधना करण्याचे महत्त्व : जे आयुष्यभर राबून अशाश्वत अशा विज्ञानाने मिळत नाही, ते साधनेत सेवा करून क्षणात मिळू शकते. हाच साधनेतील आनंद आहे.
– श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ, कुंभकोणम, तमिळनाडू. (२२.१०.२०१९)