रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !
ट्विटर आणि फेसबूक यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, तसेच भारतविरोधी विचारांचा प्रसार करणे आदी गोष्टी केल्या जातात. अशा सामाजिक माध्यमांवर भारतात कधी बंदी घातली जाणार ? – संपादक
मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.
Russia bans Facebook and Instagram under ‘extremism’ law https://t.co/PP4cGohKyV
— The Guardian (@guardian) March 21, 2022
या पार्श्वभूमीवर रशियाने आता सामाजिक माध्यमे असणार्या ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांच्यावर बंदी घातली आहे. रशियाने या दोन्ही संकेतस्थळांना ‘आतंकवादी संघटना’ घोषित करत ही बंदी घातली आहे.