जम्मू-काश्मीरच्या राजघराण्याचे वंशज विक्रमादित्य सिंह यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना कळू न शकल्याचा आरोप !

काँग्रेसच्या अधःपतनाला आरंभ झाला असून असे अशा अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भविष्यात पक्ष सोडल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक

जम्मू-काश्मीरच्या राजघराण्याचे वंशज विक्रमादित्य सिंह

श्रीनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांचे पुत्र तथा जम्मू-काश्मीरच्या राजघराण्याचे वंशज विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस पक्षाचे त्यागपत्र दिले. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात, ‘मी अखिल भारतीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र देत आहे’, असे म्हटले आहे.

त्यागपत्रामागचे कारण देतांना ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना आणि आकांक्षा लक्षात घेण्यास आणि त्याप्रमाणे कृती करण्यास काँग्रेस असमर्थ ठरली आहे, असा माझा विश्‍वास आहे.’’ ते पुढे असेही म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील गंभीर सूत्रांवर  माझी भूमिका काँग्रेस पक्षाशी जुळत नाही. काँग्रेस जम्मू-काश्मीरमधील वास्तव जाणून घेण्यास अपयशी ठरली आहे.’’