‘सेन्सोडाइन’ या ‘टूथपेस्ट’चे विज्ञापन निघाले खोटे : १० लाख रुपयांचा दंड

अशी खोटी आणि फसवी विज्ञापने करणार्‍या सर्वच आस्थापनांवर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक

नवी देहली – बाजारातील ‘सेन्सोडाइन’ या ‘टूथपेस्ट’चे ‘दांतो की झनझनाहट’ हे विज्ञापन खोटे निघाले. विज्ञापनाद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी ‘केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा’ने ‘सेन्सोडाइन’ आस्थापनाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह प्राधिकरणाने या आस्थापनालाा दिशाभूल करणारे सदर विज्ञापन येत्या ७ दिवसांत हटवण्याचा आदेशही दिला.

‘सेन्सोडाइन’ने नुकत्याच आपल्या अधिकृत प्रकाशनात ‘जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेली टूथपेस्ट’ आणि ‘जगातील प्रथम क्रमांकाची संवेदनशील टूथपेस्ट’ असा दावा करणारे विज्ञापन प्रसिद्ध केले होते.