अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत चालू झालेली मुलींची शाळा अवघ्या काही घंट्यांत बंद !

भारतातील तथाकथित स्त्रीवादी नेत्या, संघटना, मानवाधिकार संघटना याविषयी कधीच तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक 

काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानने २३ मार्च या दिवशी  अफगाणिस्तानमधील मुलींच्या माध्यमिक शाळा उघडल्यानंतर काही घंट्यांतच त्या पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला. तालिबानचा प्रवक्ता इनामुल्ला समंगानी याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘ए.एफ्.पी.’ वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी मुलींच्या शाळा चालू झाल्याने राजधानी काबुलमधील जरघोना हायस्कूलचे चित्रीकरण करत होते. त्या वेळी एक शिक्षक आला आणि त्याने सर्व मुलींना घरी जाण्याचा आदेश दिला.