केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर तूर्तास कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मुंबई महापालिकेने तूर्तास कारवाई करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. ही कारवाई रोखण्यासाठी राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे#NarayanRane #HighCourt #BMC #Shivsena #BJP https://t.co/2edGCSAIrA
— ABP माझा (@abpmajhatv) March 22, 2022
या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने राणे यांना महापालिकेने पाठवलेल्या या नोटिशीला उत्तर देतांना ‘ते बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन त्यावर पालिकेने निकाल द्यावा. हा निकाल राणे यांच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये, म्हणजे निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणे यांच्याकडे उपलब्ध राहील’, असेही निकालात स्पष्ट केले आहे.