भाजप, बजरंग दल आणि विहिंप यांच्या विरोधानंतर शिवमोग्गा जत्रोत्सवात मुसलमान दुकानदारांना अनुमती नाकारली
शिवमोग्गा (कर्नाटक) – भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या विरोधानंतर ‘शिवमोग्गा उत्सव समिती’ने पाच दिवसांच्या कोटे मरीकंबा जत्रोत्सवात मुसलमान दुकानदारांना निविदा न देण्याचा निर्णय घेतला. हिंदु समाजातील दुकानदारांनाच जत्रोत्सवात दुकाने उघडण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी भाजप आणि इतरांनी केली होती. त्यांची मागणी ‘शिवमोग्गा उत्सव समिती’ने मान्य केली आहे.
The organising committee of Kote Marikamba Jatra in Karnataka’s Shivamogga has reportedly decided not to allot shops to Muslim traders during the festival #Karnataka #news
(@nolanentreeo) https://t.co/xthj2NQgIe— IndiaToday (@IndiaToday) March 21, 2022
दोन वर्षांतून एकदा आयोजित होणार्या कोटे मरीकंबा जत्रेत शेजारील राज्यभरातून लाखो भाविक सहभागी होतात. हिंदु धर्म मानणार्यांनीच मंदिर परिसरात व्यवसाय करावा, असा हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. शिवमोग्गा येथे नुकत्याच झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा याच्या हत्येमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.