पुष्करसिंह धामी हेच होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री !
देहरादून (उत्तराखंड) – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या भाजपने माजी मुख्यमंत्री आणि निवडणुकीमध्ये पराभूत झालेले पुष्करसिंह धामी यांनाच मुख्यमंत्रीपदाचे दायित्व दिले आहे. केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे घेण्यात आलेल्या विजयी आमदारांच्या एका बैठकीमध्ये ही घोषणा केली. धामी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि सतपाल महाराज हेसुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते.
मुझे उत्तराखण्ड राज्य के ‘मुख्य सेवक’ का पुनः दायित्व दिए जाने पर मैं प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी, केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah जी व केंद्रीय रक्षा मंत्री श्री @rajnathsingh जी सहित शीर्ष नेतृत्व का आभार प्रकट करता हूं pic.twitter.com/B4Tq7c4Np7
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) March 21, 2022