राज्यात ३ वर्षांत विजेचा धक्का लागून ९५५ लोकांचा मृत्यू ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महावितरणच्या वीजसंचमांडणीवर विजेचा धक्का लागून झालेल्या ९३२ अपघातांमधे ९५५ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत २१ मार्च या दिवशी दिली. ते पुढे म्हणाले की, विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या नागरिकांपैकी ३०२ व्यक्तींच्या वारसांना हानीभरपाई देण्यात आली आहे, तसेच ५५ मृत व्यक्तींच्या वारसांना भरपाई देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून बाकीच्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना भरपाई दिली जाईल.