न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात बंद पाळणार्‍या संघटनांवर न्यायालयाचा अवमान केल्यावरून कारवाई करण्याची मागणी

  • हिजाबबंदीच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे प्रकरण

  • हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन.पी. यांनी प्रविष्ट केली याचिका

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाबच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला राज्यात बंद पाळून विरोध करण्यात आला. हा न्यायालयाचा अवमान असल्यावरून बंदचे आवाहन करणार्‍या संघटनांच्या विरोधात २ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन.पी. यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.