‘द कश्मीर फाइल्स’ प्रत्येक भारतियाने बघायला हवा ! – आमीर खान, अभिनेते
चित्रपटाला सर्व स्तरांतून भरभरून प्रतिसाद मिळाल्यावर आमीर खान जागे झाले का ? – संपादक
मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मी नक्कीच पहाणार आहे; कारण ही घटना आपल्या देशाच्या इतिहासातील एक अशी घटना आहे, जिच्यामुळे अनेकांच्या भावनांना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेने अनेकांना दुःख दिले आहे. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंसमवेत जे काही झाले, ते पुष्कळ दुःखद आहे. त्यामुळे या विषयावरील चित्रपट प्रत्येक भारतियाने बघायला हवा, असे प्रतिपादन अभिनेते आमीर खान यांनी केले.
आमीर खान पुढे म्हणाले, ‘‘या चित्रपटाने ज्यांचा माणुसकीवर विश्वास आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना स्पर्श केला आहे. हीच या चित्रपटाची सुंदरता आहे. या चित्रपटाला एवढे यश मिळत आहे. त्याचे कौतुक होत आहे. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. मी हा चित्रपट नक्कीच पाहीन.’’