आय.पी.एल्.चे क्रिकेट सामने मुंबई येथे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने घ्यावेत ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – विधानसभेत २१ मार्च या दिवशी अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर विभागनिहाय चर्चा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग या विभागांवर चर्चा करण्यात आली. भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी क्रीडा विभागाविषयी बोलतांना आगामी ‘आय.पी.एल्.’चे क्रिकेट सामने मुंबई येथे २५ ऐवजी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने होण्यासाठी क्रीडामंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.