आम्हाला मते न देणार्यांनी आमच्याकडे साहाय्याच्या मागणीसाठीही येऊ नये !
उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार दिनेश रावत यांचे विधान
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – ‘ज्या लोकांनी आम्हाला (भाजपला) मतदान केले नाही, त्यांनी आमच्याकडे साहाय्याची मागणी करण्यासाठी येऊ नये. ज्यांनी आम्हाला मते दिली, त्यांनाच आम्ही साहाय्य करणार आहोत, असे विधान येथील हैदरगड मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिनेश रावत यांनी केले. हैदरगड येथे होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.