‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा संयुक्त उपक्रम
देहली – ‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या विद्यमाने एका विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या वेळी येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. निधी सेठ यांनी ‘होळी आणि रंगपंचमी यांमागील अध्यात्मशास्त्र’, होळीचे ‘पूजन कसे करावे ?’ आदींविषयी मार्गदर्शन केले. सनातनचे श्री. चंद्र प्रकाश यांनी ‘आपत्काळात अग्निहोत्राचे महत्त्व’ विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साक्षी चढ्ढा यांनी केले.
क्षणचित्र : या कार्यक्रमातील जिज्ञासू सौ. अर्चना शर्मा यांनी सांगितले की, त्या प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करतात. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या दुकानामध्ये चैतन्याची अनुभूती येते.