कुरकुंभ (पुणे) औद्योगिक वसाहतीतून साडेपाच कोटींचे केमिकल चोरीला !
असुरक्षित पुणे औद्योगिक वसाहत ! चोरांना कायद्याचे भय नसल्याचेच हे उदाहरण !
कुरकुंभ (पुणे) – येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘इटर्निस फाईन केमिकल’ या आस्थापनाच्या ‘कॅटॅलिस्ट रूम’मधून ‘जॉनसन मॅथे’ या अमेरिकन आस्थापनाकडून आलेले २० किलो ‘रोडियम ऑन अल्युमिना’ नावाचे ५ कोटी ४७ लाख २० सहस्र ३४५ रुपयांचे केमिकल चोरीला गेले आहे. आस्थापनाचे विष्णु डुबे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. येथील औद्योगिक क्षेत्रात केमिकल चोरीचे सत्र चालूच असून त्यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.