कर्नाटकातील प्रसिद्ध होसा मारीगुडी मंदिराच्या परिसरात धर्मांधांना दुकाने चालवू देणार नाही !
|
मंदिर प्रशासनाचा स्तुत्य निर्णय ! खरेतर हा निर्णय आधीच घेणे अपेक्षित होते. बहुतांश मशिदी किंवा चर्च यांच्याबाहेर कधी हिंदू दुकाने उभारतात का ? किंवा ती उभारली, तर धर्मांध तेथून काही खरेदी करतील का ? – संपादक
उडुपी (कर्नाटक) – मंदिराच्या परिसरात कोणत्याही धर्मांधाला दुकान चालवू देणार नाही, असा निर्णय जिल्ह्यातील कापू गावात असलेल्या होसा मारीगुडी मंदिराने घेतला आहे. १७ मार्च या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील शाळा-महाविद्यालयांत हिजाबबंदी कायम ठेवण्याचा निकाल दिल्यावरून येथील पूजासाहित्य विकणार्या धर्मांधांच्या दुकानदारांनी त्यास विरोध करत बंद पुकारला होता. बंदच्या काळात हिंदु भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील हिंदु जागरण वेदिके (हिंदु जागरण संघटना) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कापूच्या नगरपालिकेला पत्र लिहून मंदिराच्या वार्षिक मेळाव्यात मंदिर परिसरात धर्मांधांना दुकान लावण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी केली. तसेच मंदिर प्रशासनालाही या प्रकारचे पत्र देण्यात आले. मंदिर प्रशासनाने याची नोंद घेत वरील निर्णय दिला आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रशांत शेट्टी यांनी दिली.
१. दुसरीकडे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व्यंकटेश नावड यांनी सांगितले, ‘आम्हाला हिंदु संघटनांची पत्रे अवश्य मिळाली; परंतु भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये सर्व धर्मांच्या लोकांना दुकाने उघडण्यासाठी अनुमती आहे. (प्रशासनाच्या या ‘धर्मनिरपेक्ष’ वृत्तीचा हिंदूंनाच आतापर्यंत फटका बसत आला आहे. नगरपालिकेची ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी जेव्हा धर्मांधांनी बंद पुकारून पूजासाहित्याची दुकाने बंद ठेवली, तेव्हा कुठे गेली होती ? त्यांच्यावर कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ?, याविषयी नावड बोलतील का ? – संपादक)
२. ज्या हिंदु दुकानदारांना मंदिर परिसरात दुकाने लावण्याची अनुमती मिळाली आहे, त्यांनी मंदिर प्रशासनाला याची हमी द्यावी की, ते कोणत्याही मुसलमान व्यक्तीसमवेत भागीदारी करणार नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने हे योग्य असेल, असेही मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.
१०० दुकाने उभारण्याची केवळ हिंदूंनाच अनुमती !
२२ आणि २३ मार्च या दिवशी मंदिराच्या वार्षिक मेळ्याचे आयोजन होत आहे. यामध्ये जवळपास १ लाख भाविक सहभागी होत असतात. १८ मार्च या दिवशी १०० दुकाने उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या वेळी केवळ हिंदूंनाच दुकाने उभारण्याची अनुमती देण्यात आली आहे. या दुकानांमध्ये फुले, नारळ आणि प्रसाद यांची विक्री केली जाणार आहे.