कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार !
हिजाबबंदीचा निकाल देणार्या न्यायाधिशांना देण्यात आलेल्या धमकीवर धर्मनिरपेक्षतावादी मौन आहेत ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई
बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाबबंदीच्या प्रकरणी निर्णय देणार्या न्यायाधिशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. या न्यायाधिशांची हत्या करण्याची धमकी तमिळनाडूच्या ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली होती. ‘न्यायाधिशांना धमकी देऊन ३ दिवस झाले, तरी धर्मनिरपेक्षतावादी यावर मौन धारण करून आहेत’, असेही मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले. ते पुढे म्हणाले की, धमकी देणार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी आमच्या पोलिसांना सूचना केली आहे की, आरोपींच्या विरोधात योग्य कारवाई केली पाहिजे. जी कलमे लावायची, ती सर्व लावा !