१०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये सरकारचे अपप्रकार उघड करणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

प्रवीण दरेकर

सातारा, २० मार्च (वार्ता.) – राज्यातील उत्तम असणार्‍या ४-५ बँकांपैकी एक असलेल्या मुंबै बँकेला जाणून-बुजून लक्ष्य केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. या नात्याने सरकारचे अपप्रकार मी उजेडात आणत आहे. यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे नोंद करून मला अटक करण्यासाठी आटापिटा केला जात आहे. मला १०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये मी सरकारचे अपप्रकार उघड करणारच, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिली. सातारा येथे दौर्‍यावर असतांना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.