कॅनडामधील एका मशिदीमध्ये एका तरुणाकडून मुसलमानांवर कुर्हाडीद्वारे आक्रमण
माँट्रियल (कॅनडा) – टोरंटोच्या मिसिसागा या उपनगरात १९ मार्चच्या दिवशी एका २४ वर्षीय तरुणाने कर्हाडीद्वारे येथील एका मशिदीमध्ये काही जणांवर आक्रमण केले. यात काही जण घायाळ झाले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी म्हटले, ‘द्वेष निर्माण करण्यासाठी त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे.’ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आक्रमणाचा निषेध केले. ते म्हणाले की, अशा घटनेला कॅनडामध्ये कोणतेही स्थान नाही.
Canada mosque: Worshippers stop axe wielding attacker https://t.co/ljiFilxUA3
— BBC News (UK) (@BBCNews) March 20, 2022
The attack on congregants at the Dar Al-Tawheed Islamic Centre is incredibly disturbing. I strongly condemn this violence – which has no place in Canada – and I’m keeping the community in my thoughts today. I also want to applaud the courage of those who were there this morning.
— Justin Trudeau (@JustinTrudeau) March 19, 2022
गेल्या वर्षी जून मासामध्ये कॅनडातील ओंटारियोमध्ये एका व्यक्तीने एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनडातील कुटुंबाला ट्रकखाली चिरडले होते. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता.