गेल्या २ वर्षांत २० मार्च या दिवशी देशभरात कोरोनाचे सर्वांत अल्प नवे रुग्ण !
नवी देहली – देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या असून चौथी लाट लवकरच येईल, अशी चर्चा होत असतांना सध्यातरी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे. रविवारी, २० मार्च या दिवशी देशभरात कोरोनाचे एकूण १ सहस्र ७६१ नवे रुग्णच आढळले. ही संख्या जवळपास २ वर्षांतील सर्वांत अल्प संख्या आहे.