‘असानी’ चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबारमध्ये जोरदार वादळ आणि पाऊस !
पोर्ट ब्लेअर (अंदमान) – अंदमान-निकोबार द्वीपसमुहावर ‘असानी’ चक्रीवादळ धडकल्याने येथे जोरदार वादळ आणि पाऊस झाला. मासेमार्यांना समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमार यांच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.