छपाईचे कागद संपल्याने श्रीलंकेमध्ये शालेय परीक्षाच रहित !
कोलंबो (श्रीलंका) – कोलंबोमध्ये छपाईचे कागद संपल्याने आणि नवीन कागदाच्या आयातीसाठी निधी नसल्याने ४५ लाख शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रहित केल्या आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. सध्या श्रीलंका वर्ष १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अन्न, इंधन आणि औषध यांची कमतरता जाणवू लागली आहे.
Sri Lanka Cancels School Exams Over Paper Shortage https://t.co/PVZ5zNLu4V pic.twitter.com/bxzhipdbKJ
— NDTV News feed (@ndtvfeed) March 20, 2022
देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.