न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !
धर्मांध संघटनांनी केला होता विरोध !
प्रसारणाला अनुमती नाकारणे, हा स्वातंत्र्यावर घाला ! – विन्स्टन पीटर्स, माजी उपपंतप्रधान, न्यूझीलंड
|
नवी देहली – न्यूझीलंडच्या सेन्सॉर बोर्डाने आधी अनुमती दिलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणावर आता बंदी घातली आहे. काही धर्मांध संघटनांनी या चित्रपटाला विरोध करत सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट प्रसारित न करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे. हा निर्णय म्हणजे न्यूझीलंडच्या नागरिकांच्या आणि जागतिक समुदायाच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासमानच आहे.’’
‘Censoring The Kashmir Files will mean censoring Information’: Former New Zealand Deputy PM after Chief Censor decides to review the moviehttps://t.co/24ZT0rhLCN
— OpIndia.com (@OpIndia_com) March 19, 2022
पीटर्स यांनी फेसबूक पोस्टद्वारे पुढे म्हटले आहे, ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणावर बंदी लादणे हे एकप्रकारे न्यूझीलंडमधील १५ मार्चच्या आतंकवादी आक्रमणाचा विषय ‘सेन्सॉर’ (बंदी आणणे) करण्यासारखेच आहे, तसेच ९/११ च्या अमेरिकेतील आक्रमणाच्या संदर्भातील स्मृती नष्ट करण्यासमानच हा निर्णय आहे. १५ मार्च २०१९ या दिवशी देशातील क्राईस्टचर्च येथे जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये ५१ न्यूझीलँडर्स ठार झाले होते.