‘द काश्मीर फाइल्स’चा ‘भाग-२’ बनवा !
जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांचे आवाहन !
रुडकी (उत्तराखंड) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीरमधील अत्याचाराची थोडक्यात माहिती देणारा आहे. याचाही ‘भाग-२’ बनवावा, तसेच भारताच्या फाळणीवरही आधारित चित्रपट बनवायला हवा, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांनी केले आहे. ‘केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे लागेल. भारतातील मोदी सरकारमुळेच ‘द काश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला आणि सत्य भारतातील जनतेसमोर आले’, असेही ते म्हणाले.
१५० साधू आणि संत यांच्यासाठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
येथील नीलम चित्रपटगृहामध्ये श्रीपंच दशनम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि जीवनदीप आश्रम रुडकीचे पीठाधीश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांनी साधू, संत आणि पत्रकार यांच्यासाठी या चित्रपटाचा एक खेळ आरक्षित केला होता.