एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची पोलिसांकडून चौकशी
जिहादी आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म प्रेमी कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा कार्यकर्त्यांची वारंवार नाहक चौकशी करणारे आणि स्वतःसह कार्यकर्त्यांचाही अमूल्य वेळ वाया घालवणारे पोलीस !
एका शहारात गोपनीय शाखेतील पोलिसांनी नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात त्यांचे छायाचित्र घेऊन बोलावले आणि त्यांची पुढीलप्रमाणे चौकशी केली.
पोलीस : तुमचे छायाचित्र आणि माहिती हवी होती.
कार्यकर्ता : तुमच्याकडे माझी धारिका (फाईल) आहे ना ?
पोलीस : फाईल मिळत नाही. संगणकामधून फाईल नष्ट (करप्ट) झाली आहे. (पोलीस खात्यातील भोंगळ कारभार ! धारिका खरेच नष्ट झाली आहे कि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची पुन:पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलीस खोटे कारण सांगत आहेत, असा प्रश्न जनतेला पडल्यास चूक ते काय ? धारिका खरेच नष्ट झाली असेल, तर याची पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडून चौकशी झाली पािहजे आणि अशा किती पोलिसांकडून धारिका नष्ट झाल्या आहेत, याचा शोध घेतला पाहिजे ! – संपादक)
(पोलिसांनी कार्यकर्त्याचे छायाचित्र घेतले आणि ‘स्कॅन’ करून परत दिले, तसेच कार्यकर्ता अन् त्याचे कुटुंब यांची माहिती नोंद करून घेतली.)
कार्यकर्ता : माहिती कशाला घेतली ?
पोलीस : सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांची माहिती अद्ययावत करून नेहमीप्रमाणे पुढे कळवायची आहे.
४ दिवसांनी गोपनीय शाखेतील अन्य एका पोलिसाने समितीच्या याच कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संपर्क करून पुढील प्रकारे चौकशी केली.
पोलीस : तुम्ही … यांना ओळखता का ?
कार्यकर्ता : ओळखत नाही. कशाला विचारत आहात ?
पोलीस : त्यांची माहिती हवी होती. एक जण विचारत होते.
(एवढे सांगून पोलिसांनी दूरभाष बंद केला.)
दुसर्या दिवशी अन्य एका कामासाठी हे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस म्हणाले, ‘‘तुमची जशी माहिती घेतली ‘तशी … यांची हवी होती. त्या सध्या कार्य करत आहेत कि नाहीत ? हे कळवायचे होते.’’
विविध संघटनांची चौकशी करत असल्याच्या नावाखाली पोलिसांकडून सनातनच्या साधकांची वारंवार चौकशी !
… या दिवशी एका शहरातील विशेष शाखेतील पोलीस हवालदाराने एका साधकाची चौकशी केली. या वेळी त्यांच्यात पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
पोलीस : तुम्ही कुठे आहात ? तुम्हाला भेटायचे होते. मी तुमच्या क्षेत्रात आहोत.
(साधकाने ५ मिनिटांत येतो, असे सांगितले. तोपर्यंत पोलीस हवालदार आणि त्यांचे सहकारी बाहेर येऊन थांबले होते. साधकाने त्यांना ओळखपत्र दाखवायला सांगितले. पहिल्यांदा त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास टाळाटाळ केली. नंतर पोलीस हवालदाराने ओळखपत्र दाखवले; मात्र सहकारी पोलिसाने दाखवले नाही.)
पोलीस : हे क्षेत्र आमच्या अंतर्गत येते. आम्ही सर्व संघटनांची माहिती घेत आहोत. ही माहिती आम्ही नेहमी घेत असतो. त्यात काळजी करण्यासारखे काही नाही.
त्यानंतर पोलिसांनी काही साधकांची माहिती विचारली.
साधक : मी सध्या येथे रहात नाही. दुसर्या राज्यात असतो. त्यामुळे या साधकांविषयी मला काही माहीत नाही.
पोलीस (एका प्रकरणाविषयी बोलतांना) : सगळा राजकीय खेळ चालू आहे. मी सनातनला पूर्वीपासून ओळखतो. तुमचे कार्य चांगले आहे.