‘एम्.आय.एम्.’चा माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान यास अटक !
|
बुलढाणा – जिल्ह्यातील मलकापूर येथील बनावट नोटांच्या प्रकरणी पोलिसांनी ‘एम्.आय.एम्.’चा माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहजाद खान सलीम खान यास मलकापूर येथील माळीपुरा मंगलगेट परिसरातून १८ मार्च या दिवशी अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. २३ फेब्रुवारी या दिवशी मलकापूर शहरातील एच्.डी.एफ्.सी. बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर आणि नांदुरा येथून ६ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. पटनी याच्या चौकशीतून शहजाद खान याचे नाव समोर आले होते.