साधकांनो, २५.३.२०२२ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित देयसंकलन करणे (वसुली) पूर्ण करा !
जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांचे देयसंकलन करणे (वसुली) मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. देयसंकलन करणे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २५.३.२०२२ पर्यंत देयसंकलन करणे पूर्ण करावे. प्रलंबित देयसंकलन करण्याचा जिल्हानिहाय आढावा पुढे दिला आहे.
१. नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनांचे देयसंकलन
२. ‘सनातन पंचांगा’च्या विज्ञापनांचे प्रलंबित असलेले देयसंकलन
३. गुरुपौर्णिमेच्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांचे प्रलंबित देयसंकलन
४. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या मराठी भाषेतील ग्रंथांच्या विज्ञापनांचे प्रलंबित देयसंकलन : जळगाव, बेळगाव
५. ‘प्रलंबित देयसंकलन वेळेत पूर्ण केले, तरच आपली सेवा परिपूर्ण होणार आहे’, हे लक्षात घ्या !
‘प्रलंबित राहिलेले सर्व देयसंकलन वेळेत पूर्ण करणे, ही आपली साधना आहे’, हे लक्षात घेऊन उत्तरदायी साधकांनी २५.३.२०२२ या दिवसापर्यंत देयसंकलन पूर्ण करण्याचे नियोजन करावे. यापुढेही जिल्हास्तरावर धर्मप्रसाराचे नियोजन करतांना प्रत्येक मासाला प्रथम प्राधान्याने देयसंकलन पूर्ण करण्याचे वेळोवेळी नियोजन करावे.
साधकांनो, विज्ञापने घेण्याची सेवा करतांना खालील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला हातभार लावण्यास इच्छुक असलेल्यांकडून विज्ञापने घेण्याची सेवा साधकांना ईश्वरी कृपेने लाभत आहे. विज्ञापने घेतांनाच रक्कम घेतल्यास अथवा काही अडचण असल्यास विज्ञापने छापून आल्यावर त्वरित देयसंकलन पूर्ण केल्यास ही सेवा गुरूंना अपेक्षित अशी होईल. साधक विज्ञापनदात्यांकडे वेळेवर जात नसल्याने बर्याच वेळा त्यांनी तो निधी अन्यत्र वापरल्याचे लक्षात येते. त्यामुळे नंतर देयसंकलन पूर्ण करण्यात साधकांना पुष्कळ ऊर्जा व्यय करावी लागते, तसेच संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत असल्याने नव्याने जोडलेल्या हितचिंतकांना भेटण्यास वेळ अपुरा पडतो. |