युक्रेनला प्रादेशिक अखंडता आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन
कीव (युक्रेन) – रशियाने कोणताही विलंब न करता चर्चेसाठी त्वरित सिद्ध व्हावे, तसेच युक्रेनला प्रादेशिक अखंडता आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केले आहे.
Zelenskyy in fresh video calls for restoring territorial integrity, justice for Ukraine https://t.co/ksRxJVd2aU
— The Times Of India (@timesofindia) March 19, 2022
दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जर्मनीच्या चॅन्सलर यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. या वेळी पुतिन यांनी ‘युक्रेन शांतता बैठकांमध्ये रशियासमोर अवास्तव प्रस्ताव ठेवून अडथळे निर्माण करत आहे’, असा आरोप केला.
Russian President Vladimir Putin Accuses Ukraine of Stalling Peace Talks.#putin #UkraineRussiaWar #ukraine #russia
Read: https://t.co/tdoYJmLoyG pic.twitter.com/4l5Cpxs5nl
— News18.com (@news18dotcom) March 18, 2022
दोन्ही देशांतील युद्धावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ब्रिटनने ‘युक्रेनी सैन्याच्या प्रतिकाराची तीव्रता आणि व्याप्ती पाहून रशिया आश्चर्यचकित झाला आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.