(म्हणे) ‘हिजाबविषयी निर्णय देणार्या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्याला तेच उत्तरदायी असतील !’
तमिळनाडूतील ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेच्या कार्यकर्त्याचे विधान
पोलिसांकडून अद्यापही कारवाई नाही !
|
चेन्नई (तमिळनाडू) – जर हिजाबच्या प्रकरणी निर्णय देणार्या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्यासाठी ते स्वतःच उत्तरदायी असतील. भाजपने न्यायपालिका विकत घेतली आहे. न्यायालयाचा आदेश अवैध आहे. न्यायालयाने हा निर्णय अमित शहा यांच्या आदेशावरून घेतला आहे. असा निर्णय देणार्या न्यायाधिशांना लाज वाटली पाहिजे. न्यायाधिशांना वैयक्तिक विचारांमुळे नाही, तर राज्यघटनेच्या आधारे निर्णय द्यायला हवा, असे विधान तमिळनाडूतील ‘तौहीद जमात’ नावाच्या एका इस्लामी संघटनेचा कार्यकर्ता कोवाई आर्. रहमतुल्लाह याने केले. तौहीद जमात संघटनेने तमिळनाडूतील मदुराई येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता. या विधानाचा एक व्हिडिओ ‘इंदू मक्कल’ नावाच्या ट्विटर खात्याद्वारे प्रसारित करण्यात आला आहे. इंदु मक्कलने याकडे तमिळनाडू पोलिसांचे लक्ष वेधून ‘पोलीस शांत बसून केवळ तमाशा पहाणार आहेत का ?’ असा प्रश्न विचारला आहे.
Hijab row: TNTJ issues death threats to Karnataka HC judges over case verdict https://t.co/of2YchSsDE
— Republic (@republic) March 19, 2022
(म्हणे) ‘मुसलमानांवर आक्रमण कराल, तर मैदानातच भेटू !’
या व्हिडिओमध्ये रहमतुल्लाह म्हणतो की, भारतात साधु कुठेही नग्न होऊन फिरू शकतात; मात्र मुसलमान मुलींना बुरखा घालण्यास बंदी घातली जाते. जर तुम्ही मुसलमानांवर आक्रमण कराल, तर आपण मैदानातच भेटू, अशी थेट धमकी त्याने दिली.
(म्हणे) ‘आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा तुमचा निःपात होईल !’
रहमतुल्लाह पुढे म्हणतो की, आम्ही मोदी, योगी अथवा अमित शहा यांना नाही, तर केवळ अल्लाला घाबरतो. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. जर आमचा संयम सुटला, तर तुमचा निःपात होईल, अशीही धमकी त्याने दिली.